Home सामाजिक विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते : गौरव अहिवळे..!!

विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते : गौरव अहिवळे..!!

0
विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते : गौरव अहिवळे..!!

बारामती : बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा याबाबत भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने बारामती नगरपरिषद उपमुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.दिनांक ०३/०९/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजलेपासून बारामती नगर परिषद समोर संघटनेच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार होते.सदर उपोषणाची दखल घेऊन बारामती नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र देऊन आश्वासन दिले की सदर रस्त्याची मागणी नुसार निधी उपलब्ध करून रस्ता करणेबाबत कार्यवाही करण्यात येईल.त्यामुळे सदर उपोषण स्थगित केले.पत्र स्वीकारताना भारतीय युवा पँथर संघटनेचे गौरव अहिवळे संस्थापक अध्यक्ष,शुभम गायकवाड संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य,अस्लम शेख पुणे जिल्हाध्यक्ष, निखिलभाई खरात बारामती शहराध्यक्ष, समीर खान संघटक बारामती शहर यावेळी उपस्थित होते.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते ही शोकांतिका आहे. शहरात सुशोभीकरण करणे म्हणजे विकास नव्हे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत दगडाचे देखावे करून खोट्या विकासाचा प्रचार बारामतीत केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here