बारामती:- पुणे जिल्हा असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बारामती लोकसभा अध्यक्षपदी राज भरत कांबळे यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी दिले.राज भरत कांबळे यांनी इंदापूर,दौंड,बारामती,पुरंदर-हवेली ,भोर या सर्व मतदारसंघांमध्ये असंघटित कामगार कर्मचारी वर्गाची कामे चांगली केली असून या कामाला गती मिळण्यासाठी व कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कांबळे यांची कार्यसम्राट आमदार मा.संग्रामदादा थोपटे तसेच पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार मा.संजयजी जगताप,प्रदेशाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे ही निवड करण्यात आली असून या निवडी प्रसंगी पुणे जिल्हा असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ माळी,हवेली तालुका VJNT काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष काळे,बारामती काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस निलेश गजरमल आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.