बारामती नगर परिषदेसमोर रोजंदारी वरील सफाई कामगार बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत सदर आंदोलनाला भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
बारामती नगररिषदेमध्ये सन १९९३ पुर्वी च्या रोजंदारीवरील शासकीय नियमानुसार नियमित झालेल्या सफाई कामगार यांना दि. २४/०२/२०२३ रोजी शासन निर्णय ३ मधील तरतुदी नुसार सफाई कामगार यांच्या वारसांना पुन्हा लाड समितीच्या शिफारशीप्रमाणे नोकरी देणे बंधनकारक आहे. परंतु प्रशासन जाणीवपुर्वक रोजंदारी वरील सफाई कामगार यांच्या वारसांना नोकरी देण्यास टाळाटाळ करत असल्याने बेमुदत धरणे आंदोलन कर्मचाऱ्यांनी केले आहे सदर आंदोलनाला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे ,संपर्कप्रमुख शुभम गायकवाड,पुणे जिल्हा अध्यक्ष अस्लम (वस्ताद) शेख,बारामती शहर अध्यक्ष निखिल भाई खरात,सच्चे का बोलबाला संपादक दशरथ मांढरे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.