दि.२९/१०/२०२४(आंबेगाव प्रतिनिधी)
काही दिवसापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून श्री.दिपक पंचमुख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी जाहीर झाल्याबरोबरच श्री.दिपक पंचमुख यांनी आंबेगाव विधानसभा लढवण्यासाठी सज्ज होत नामांकन अर्ज भरण्यासाठी तयारी केली.दिपक पंचमुख यांची नामांकन रॅली दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आंबेगाव छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सुरू करण्यात आली. पंचमुख यांनी सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करण्याकरता तसेच सर्व धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याकरता प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत पुढे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन केले तसेच सर्व धार्मिक स्थळांचे दर्शन घेत नामांकन रॅली सुरू करण्यात आली.
नामांकन रॅलीमध्ये आंबेगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. या नामांकन रॅलीत सहभागी आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवाजी राजगुरू,आंबेगाव तालुका युवा अध्यक्षविवेक थोरात,आंबेगाव तालुका माथाडी अध्यक्षपंकज सरोदे,आंबेगाव महिला तालुका अध्यक्ष हिराबाई साबळे,पुणे जिल्हा अध्यक्ष युवा विक्रांत आल्हाट,पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवाशंकर शिंदे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवा भानुदास भोसले, आंबेगाव महासचिव युवा उत्तम थोरात, कुर्ला महासचिव मुंबई रमाकांत जाधव, आंबेगाव महिला महासचिव जयश्री शिंदे ,शिरूर तालुका महिला अध्यक्षसायली भोसले,आंबेगाव महिला उपाध्यक्ष पूजा गोरे, पुणे जिल्हा उपाध्यक्षनफिज शेख,आंबेगाव तालुका महासचिव मधुकर चाबुकस्वार, आंबेगाव तालुका सा.कार्यकर्ते रतन साबळे,भारतीय बौद्धमहासभा आंबेगाव तालुका सरचिटणीस महेश वाघमारे,आंबेगाव तालुका उपाध्यक्ष अनिल गायकवाड,आंबेगाव तालुका संपर्कप्रमुखधनेश राजगुरू,शिरूर तालुका अध्यक्ष युवा आकाश निकाळजे, शिरूर तालुका महासचिव पट्टेकर,म्हाळुंगे शहर प्रमुख रोहिदास शिशुपाल,आंबेगाव तालुका सा .कार्यकर्ते शिंदे साहेब, गोहेबुद्रुक ग्रामपंचायत सदस्य लता बबन थोरात,शिरूर तालुका उपाध्यक्ष शरद पवार,तसेच सर्व जिल्हा आणि तालुका कार्यकर्ते व पदाधिकारी जनसमुदाय उपस्थित होता.