Home क्राईम डायरी ऊस वाहतूकदारांना ऊस तोडणी मुकादम यांनी फसवल्या प्रकरणी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल..!!

ऊस वाहतूकदारांना ऊस तोडणी मुकादम यांनी फसवल्या प्रकरणी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल..!!

0
ऊस वाहतूकदारांना ऊस तोडणी मुकादम यांनी फसवल्या प्रकरणी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल..!!

बारामती : ऊस वाहतूकदार जगदीश बबनराव देवकाते राहणार निरावागज यांनी माळेगावं पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरून ऊस तोडणी मुकादम भूषण भट्ट पारखे रा.धुळे जि.धुळे व शंकर रामधन राठोड रा. जातेगाव ता.गेवराई जि.बीड यांचे विरुद्ध आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी यांनी वरील मजकुरातील मुकादम यांना ऊसतोडणी एकूण ३० मजुरांसाठी तेवीस लाख पन्नास हजार रुपये घेऊन कोणतेही ऊसतोडणी कामगार न पुरवता दि. २९/०८/२०२१.रोजी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले असून,या प्रकरणी अंमलदार पो.ना.गजरे व सहा.फौजदार ताकवणे अधिक तपास करत आहेत. व दुसऱ्या एका प्रकरणी ऊस वाहतूकदार फिर्यादी प्रकाश महादेव सोरटे राहणार खंडज यांनी ऊस तोडणी मुकादम महेंद्र बबन भालेराव, लक्ष्मण बबन भालेराव व बाळू रामा शिंदे हे सर्व राहणार कामोने तालुका करमाळा जिल्हा सोलापूर.यांनी दहा ऊस तोडणी कामगार यांच्या बदलेत एकूण सात लाख रुपये घेऊन, ऊस तोडणी कामगार न पुरवता दिनांक २६/०६/२०१८ ते २९/०८/२०१८च्या दरम्यान आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी ऊस तोडणी मुकादम यांचे विरुद्ध माळेगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, वरील पाच ऊस तोडणी मुकादम यांचे विरुद्ध भा.द.वि.कलम ४२० व ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक गजरे व सहाय्यक फौजदार मोहिते अधिक पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here