महसूल सप्ताहअंतर्गत सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन.
बारामती, दि.५ : जेजुरी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व संबंधित विभागप्रमुखासोबत कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीचे तहसील कार्यालय येथे आयेाजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, तुषार गुंजवटे, निरीक्षणाधिकारी लक्ष्मण माने आदी उपस्थितीत होते. तहसीलदार श्री. शिंदे म्हणाले, जेजुरी येथे सोमवार ७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे २ हजार लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात येणार असून त्यासाठी ५० बसची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना भोजन, पिण्याचे पाणी, वाहनाची व्यवस्था आदी मूलभूत सेवा पुरविण्यात याव्यात. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांच्यामार्फत लाभार्थ्यांना निमंत्रण पाठविण्याची व्यवस्था करावी. सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधितांनी दिलेल्या जबाबदारीप्रमाणे चोखपणे कामे करावीत, अशा सूचनाही तहसीलदार श्री. शिंदे यांनी दिल्या.
महसूल सप्ताहअंतर्गत सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन.
बारामती, दि.५: महसूल सप्ताहाअंतर्गत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाअंतर्गत तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय भवन येथील तहसील कार्यालयात सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, बारामती माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, सुबेदार श्री. लडकत, तालुक्यातील सैनिक उपस्थित होते. तहसीलदार शिंदे म्हणाले, या मेळाव्यात तालुक्यातील सैनिकांचे एकूण २८ अर्ज प्राप्त झाले असून या अर्जावर लवकरात लवकर कार्यवाही करुन निकाली काढण्यात येणार आहे. कार्यक्रमात सैनिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या असून त्या निरसन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही श्री. शिंदे म्हणाले. तालुक्यात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे. सशस्त्र दलात कार्यरत असणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना आवश्यक असणाऱ्या व महसूल विभागातून निर्गमित होणारे दाखल्यांचे वाटप करणे, संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित अर्जावर कार्यवाही करणे, संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी तहसीलस्तरावर आज सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.