Home सामाजिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय ,शासकीय महिला हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे रुग्णांची सेवा करण्याऐवजी गुलामगिरीची भाषा-वागणूक जास्त देतात. समाजसेवक अनिकेत मोहिते एका महिलेसाठी ठरले आरोग्य देवदूत..!!!!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय ,शासकीय महिला हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे रुग्णांची सेवा करण्याऐवजी गुलामगिरीची भाषा-वागणूक जास्त देतात. समाजसेवक अनिकेत मोहिते एका महिलेसाठी ठरले आरोग्य देवदूत..!!!!

0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय ,शासकीय महिला हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे रुग्णांची सेवा  करण्याऐवजी गुलामगिरीची भाषा-वागणूक जास्त देतात. समाजसेवक अनिकेत मोहिते  एका महिलेसाठी ठरले आरोग्य देवदूत..!!!!

समाजसेवक अनिकेत मोहिते यांच्या पाठपुराव्यामुळे गरजू गरीब महिला रुग्णाला वैद्यकीय मदत व सोनोग्राफी तपासणी त्वरित करून त्या गरीब महिलांना न्याय मिळवून दिला. महिला रुग्णांनी समाजसेवक अनिकेत मोहिते चे आभार मानले. बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय ठिकाणी निमगाव केतकी वरून एक महिला पोटाच्या उपचारासाठी आली असता तिने केस पेपर काढल्यानंतर डॉक्टरला दाखवले व त्या महिलेला महिला हॉस्पिटल ला जाऊन सोनोग्राफी करायला सांगितली. पण महिला हॉस्पिटल ला गेल्यानंतर तेथील संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भोई यांच्याकडे पेशंट तपासणीसाठी गेले असता पेशंटला सोनोग्राफीसाठी 7 दिवसांनी येण्यास सांगितले पण त्या महिलेने डॉक्टरांना विनंती केली की डॉक्टर साहेब मला खूप त्रास होतोय तर माझी सोनोग्राफी करा आणि मी खूप लांबून आलेली आहे. माझ्याकडे पैसे नाहीत व माझी परिस्थिती खूप नाजूक आहे तरी माझी तपासणी करा.

अशी विनवणी केली तरी त्यांनी त्यास दात दिली नाही व उरमटपणे मोठ्या आवाजामध्ये दरडावून तिला सांगितले की तुला सात दिवसाची वेळ दिलेली आहे तर त्याच वेळेला ये, पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता आपली सोनोग्राफी होणार नाही.
म्हणून निराश होऊन त्या महिलेने समाजसेवक अनिकेत मोहिते यांच्याशी संपर्क साधला व सर्व घडलेल्या हकीकत सांगितली व विनंती केली.
त्याचबरोबर समाजसेवक अनिकेत मोहिते यांनी लगेच तात्काळ संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भोई यांच्याशी संपर्क साधला व त्या महिलेची सोनोग्राफी करून पुढील योग्य ते औषध उपचार व तपासण्या करण्यास सूचना केली.
सदर महिलेची लगेच ताबडतोब सोनोग्राफी तपासणी करण्यात आली.
अशाप्रकारे समाजसेवक अनिकेत मोहिते व महिला रुग्णांनी घडलेल्या प्रकाराचे माहिती आमच्या प्रतिनिधीशी माहिती दिली व त्या रुग्ण महिलेला वैद्यकीय सेवा मिळवण्यास मोलाची मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here