बारामती ( प्रतिनिधी : रियाज पठाण )शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा व बारामती कराटे असोसिएशनच्या मार्गदर्शक शर्मिला पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शरयु चषक या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कराटे लीगचे आयोजन शनिवार दिनांक २१ व रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन ,दूधसंघ वसाहत,बारामती याठिकाणी शरयु फौंडशन व बारामती कराटे असोसिएशनच्या वतीने करण्यात आले असून स्पर्धेचे उदघाटन शनिवार दिनांक २१ रोजी सकाळी १० वाजता शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरच्या उपस्थितीमध्ये होणार असून बक्षीस वितरण रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार, शरयु ग्रुपचे डायरेक्टर, बारामती तालुका कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची,माहिती स्पर्धा प्रमुख संयोजक रविंद्र करळे यांनी दिली असून बारामती मधील सर्व क्रीडा प्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शरयु फौंडेशन व बारामती कराटे असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील १००० हून अधिक खेळाडू , प्रशिक्षक, मार्गदर्शक व पंच सहभागी होणार असून सहभागी खेळाडूंना सहभाग पदके व विजेत्यासाठी विजेतेपद पदके(Medals) देण्यात येणार असून २५ बेस्ट खेळाडूंना २५ स्पोर्ट्स सायकल, १० वर्षांपासून ते १८ वर्षापर्यंतच्या खेळाडूंना विविध वैयक्तिक गटामध्ये तसेच सांघिक ३ पारितोषिके असे एकूण ११,०००००/- (अकरा लक्ष रुपये) चे भरघोस पारितोषिकाचे वितरण या दोन दिवसात करण्यात येणार आहे.