बारामती प्रतिनिधी :- शिवाजीनगर काँग्रेस भवन पुणे येथे पुणे जिल्हा सेवादल काँग्रेस पक्षाच्या जिल्हा बैठकीदरम्यान बारामती सेवादल तालुका अध्यक्षपदी धडाडीचे नेते श्री. नशीब बाबासो पवार यांची नियुक्ती पुणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा लोकप्रिय आमदार संजय जगताप व पुणे जिल्हा असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बारामती विधानसभेचे पक्षनिरीक्षक विजय जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी नियुक्तीचे पत्र देताना उपस्थित बारामती तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निलेश गजरमल रमेश बापू देवकाते अजय भैय्या शिंदे सुभाष निकाळजे सुरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.