बारामती: बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा याबाबत भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने बारामती नगरपरिषद उपमुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले*.*यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे गौरव अहिवळे संस्थापक अध्यक्ष,शुभम गायकवाड संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य,अस्लम शेख पुणे जिल्हाध्यक्ष, निखिलभाई खरात बारामती शहराध्यक्ष, समीर खान संघटक बारामती शहर, गजानन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.अस्लम शेख यांनी यावेळी बोलताना सांगितले की जोपर्यंत रस्त्याचे काम होणार नाही तोपर्यंत उपोषण करणार आहे.दिनांक ०३/०९/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजलेपासून बारामती नगर परिषद समोर संघटनेच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार आहे.