बारामती: येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समिती फलटण रोड, बारामतीतर्फे ह.मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नात-ए-पाक चा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये लहान मुलांनी ह.मोहम्मद पैगंबर यांचेबाबत नात-ए-पाकच्या ओवी गाऊन त्यांचा संदेश उपस्थितांसमोर ठेवला. यामध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणार्यांना चषक देवून त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व धार्मिक पुस्तके वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी दर्गा मशिदीचे मौलाना अमीर रजा कादरी, मौलाना साजीद रजा शेख, बानपचे मा.गटनेते सचिन सातव, आसिफ खान, कासम कुरैशी, एम.पी.सय्यद, गौरव अहिवळे, तुनैर शेख चैतन्य गालिंदे, शरद सोनवणे,वीरधवल गाडे रणजीत अहिवळे, महावीर गायकवाड, मन्सूर शेख इ. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष योगेश महाडिक, वसिम तांबोळी, गुलाब कुरैशी, हाफिज कुरैशी, मुस्ताक शाह, समीर शाह, रणजीत मोतीकर, अकबर तांबोळी, साहील तांबोळी, आशपाक शेख, रफिक शिकीलकर इ. केले होते. सर्व उपस्थितांनी अन्नदानाचा आस्वाद घेतला.