बदलापूरमधील नामांकित शिक्षण संस्थेत काही महिन्यांपूर्वी चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर बदलापूरमध्ये मोठे आंदोलन उभे राहिले. सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपी अक्षय शिंदेला तात्काळ अटक केली. तसेच पोलीस कोठडीत असताना चकमकीत त्याचा मृत्यूही झाला. यानंतर आता पुन्हा एकदा बदलापूरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीनेच या गुन्ह्यात आरोपीला मदत केली. पोलिसांनी रिक्षाचालक आरोपी आणि पीडितेच्या मैत्रिणीला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.