जळगांव जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या हतनुर धरण्याचे ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत व पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.
१४ जुलै रोजी हतनूर धरणाची पाणी पातळी २०८.७७० मी. असुन एकूण साठा १६१.१० द ल घमी म्हणजेच ४१.५२ % इतका आहे. पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
दरवाज्यांची सद्य स्थिती ४१ दरवाजे पूर्ण खुले असले तरी पाण्याच्या आवक नुसार बदलण्यात येत असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहीती हतनूर प्रकल्प अभियंता एस जी चौधरी यांनी दिली आहे .
हतनुर धरणात पाणीपुरवठा असलेल्या तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढल्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे .सदर तापी नदीकाठच्या गावाच्या नागरिकांनी आपले गुरेढोरे पाण्यात सोडू नये व नदीपासून थोडे दूर राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे हतनुर पाटबंधारे अभियंता चौधरी यांनी केले आहे .