बारामती दि. 5 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार असून बारामती नगरपरिषदेने खाजगी विक्रेत्यांच्या माध्यमातून तिरंगा ध्वजाची उपलब्धता करून दिली आहे.
बारामती शहरात तिरंगा ध्वजाची विक्री केंद्र पुढीलप्रमाणे आहेत- मे. रामचंद्र कृष्णाजी गाठे आणि कंपनी कचेरी रोड, बारामती, मे. शहा दिपचंद धरमचंद स्टेशन रोड, बारामती (९४२०१७२११७), मे. दिपधर्म साडीज, स्टेशन रोड( ९८५०८३०५९८), मे. दिलीपकुमार भोगीलाल शहा स्टेशन रोड, बारामती, (८१४९८५१२६०),छाजेड गारमेंट, स्टेशन रोड,
बारामती(९३२५३११९४०), राजस्थान महावस्त्रदालन बारामती ( ७५०७७७७०१३), साकल्प वर्ल्ड कॅनॉल रोड, श्री महावीर भवन जवळ, बारामती (९७६४५१०९९९) व सागर खादी भांडार महावीर पथ, मेनरोड, बारामती (९५२७६४४६४).
झेंडा फडकवताना घ्यावयाची काळजी
* प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे.
* तिरंगा झेंडा फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा.
* अर्धा झाकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावू नये
* तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.
*अभिमान कालावधी नंतर झेंडा कोठेही ईतरत्र फेकला जावू नये याची काळजी घ्यावी.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी वर नमूद विक्रेत्यांकडून तिरंगा ध्वज खरेदी करावा. नागरीकांनी उस्फुर्तपणे ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात सहभाग नोंदवून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपली घरे, संस्था यांवर राष्ट्रीय ध्वज फडकवावा, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.