Home सामाजिक बारामती शहर पोलीस स्टेशनचे होमगार्ड संदीप कसबे यांच्यामार्फत बारामती पुणे रास्ता दरात प्रवाशांची अवैध वाहतूक सेवा 2 ऑगस्ट रोजी कसबे यांच्यावर स्वारगेट आगार व्यवस्थापकांची कारवाई

बारामती शहर पोलीस स्टेशनचे होमगार्ड संदीप कसबे यांच्यामार्फत बारामती पुणे रास्ता दरात प्रवाशांची अवैध वाहतूक सेवा 2 ऑगस्ट रोजी कसबे यांच्यावर स्वारगेट आगार व्यवस्थापकांची कारवाई

0
बारामती शहर पोलीस स्टेशनचे होमगार्ड संदीप कसबे यांच्यामार्फत बारामती पुणे रास्ता दरात प्रवाशांची अवैध वाहतूक सेवा 2 ऑगस्ट रोजी कसबे यांच्यावर स्वारगेट आगार व्यवस्थापकांची कारवाई

बारामती शहर पोलीस स्टेशनच्या होमगार्डचा प्रताप

बारामती शहर पोलीस स्टेशन चा होमगार्ड असल्याचे सांगून करतोय बारामती पुणे प्रवाशांची अवैध वाहतूक

स्वारगेट बस स्थानक आगार व्यवस्थापक श्रीमती.शिवकंन्या थोरात व श्री.गोविंद जाधव(सवाअ स्वारगेट) यांनी अवैध प्रवासी वाहतूक करताना केलेल्या कारवाईत बारामती शहर पोलीस स्टेशनचा होमगार्ड संदीप कसबे आढळून आला.

स्वारगेट बस स्थानक आगार व्यवस्थापक श्रीमती.शिवकंन्या थोरात व श्री.गोविंद जाधव(सवाअ स्वारगेट) यांनी 2 ऑगस्ट रोजी अवैध प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर वरती केलेल्या कारवाईत बारामती शहर पोलीस स्टेशनचा होमगार्ड संदीप कसबे आढळून आला व तसेच प्रशांत पाटील (कोल्हापूर) ,चिमणलाल राजपूत (मुंबई) ,राहुल पवार ,निलेश शर्मा कार्यवाही केलेल्या व्यक्तींची नावे कारवाई करत असताना बारामती येथील होमगार्ड संदीप कसबे यांनी स्वारगेट आगार व्यवस्थापकांना सांगितले की मी बारामती शहर पोलीस स्टेशन चा होमगार्ड आहे व मी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या कामानिमित्त व माझ्या नातेवाईकांना सोडण्यासाठी मी स्वारगेटला आलो होतो त्यावेळी मी स्वारगेट च्या आवारात स्टॉलवर भेळ खाण्यासाठी आलो होतो तरी माझ्यावर कारवाई करू नका आम्हालाही सांगण्यात आलं पत्रकार आपण बातमी लावू नका मी बारामती शहर पोलीस स्टेशनला होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याचा आपल्याला पुरावा देतो सहा दिवस पूर्ण झाले तरीदेखील संदीप कसबे हे पुरावा देऊ शकले नाहीत. आम्ही वेळोवेळी फोन करून पुरावा मागण्याचा प्रयत्न केला पण होमगार्ड संदीप कसबे यांनी प्रतिसाद दिला नाही त्यानंतर आम्ही बारामती बस स्टँड वरती चौकशी केली त्यावेळेस आम्हाला संदीप कसबे होमगार्ड हा अवैध प्रवासी वाहतूक करतात असे आम्हाला समजले

तरी याबाबत बारामती आरटीओ यांनी आशा प्रकारच्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहना वरती व वाहन चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

लवकरच पाठपुरावा करून होमगार्ड संदीप कसबे हे खरंच बारामती शहर पोलीस स्टेशनला 2 ऑगस्ट रोजी होमगार्ड म्हणून कार्यरत होते का नाही याचा पाठपुरावा करून सविस्तर बातमी प्रसारित केली जाईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here