Home सामाजिक आर्धापूर,जि.नांदेड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

आर्धापूर,जि.नांदेड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

0

आर्धापूर हंगामी काळात गणेश उत्सव उद्या पोळा असून दुर्गा महोत्सव आणि आण्णाभाऊ साठे जयंती आधीसन आणि उत्सव काळात शेरासह तालुक्यात शांतता सुरळीत राहावी यासाठी सकाळी अर्धापूर पोलीस ठाण्यात शांतता समितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय कबाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उज्वला पांगरकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील व नगर अध्यक्ष छत्रपती कानोडे साहेब वीज वितरणचे सहायक अभियंता अविनाश रामगिरीवार नगरपंचायत चे मुख्याधिकारी शैलेश पडसे अँड किशोर देशमुख भाजपाचे पदाधिकारी नगरसेवक बाबुरावजी लंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी आर्धापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक जाधव साहेब यांनी उपस्थित मान्यवराचा सत्कार करून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी बोलताना विजय कबाडे सर म्हणाले हंगामी काळातील सण उत्सव काळात सामाजिक एकोपा जपून उत्सव सण साजरे करावेत यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच न केल्यास पोलीस कायद्या प्रमाणे कारवाईक नक्कीच होईल असे ठणानून सांगितले तसेच उत्सव काळात डीजेवर बंदी असून सर्वच न्यायालयाचे आदेश सर्वांनी पाळावे असे आवाहन केले.

तर याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सल्लागार लक्ष्मीकांत मुळे यांनी गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील गरीब आणि होतकरू आणि निराधार समाज बांधवांना मदत करावी असे आव्हान करून पत्रकार संघाच्या वतीने अंगणवाडीतील विद्यार्थी यांना विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचे जाहीर केले याविषयी शहर आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निळकंठ मदने यांनी केले तर पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड यांनी सर्वांच्या आभार मानले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here