विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वत: च्या राहत्या घरात धारदार दोन तलवारी व एक सुरा बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सिरसाळा पोलिस स्टेशन हद्दीतील जुना बस स्टँड रोड सोनार गल्ली येथे उघडकीस आली आहे
याबाबत आधीक महिती अशी की,
गणेश उत्सवाच्या पार्शभूमिवर येथील पोलीसांनी कडेकोट नियंत्रण ठेवले असून बारीक सारीक छोट्या मोठ्या घटनेवर लक्ष वेधून सिरसाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे हे बारकाईने लक्ष देत असतानाच अचानक गुप्त बातमी दारा मार्फत महिती मिळाल्याने त्यांनी येथील जुना बस स्टँड रोड सोनार गल्ली येथे राहणाऱ्या अक्षय अशोकसिंग चौहाण वय (२१) वर्ष हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वत: च्या राहत्या घरात धारदार दोन तलवारी व एक सुरा बाळगत असल्याचे निदर्शनास आल्याने त्वरित आरोपीस धार धार तलवारिसह ताब्यात घेऊन भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अनवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही सिरसाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना संतोष जेटेवाड, पो ना अंकुष मेंडके, पो अर्शद सय्यद, पो अक्षय देशमुख आदिंनी केली आहे.