जहांगीर पंडोल या त्यांच्या सहकाऱ्यांचा दुर्दैवी असा मृत्यू तर महिला चालक अनयता पंडोल आणि दरीयस पंडोल हे गंभीर जखमी..!!
पालघर – मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मधील चारोटी येथे झालेल्या भीषण अपघातात टाटा समूहाचे सायरस मिस्त्री यांच्यासह जहांगीर पंडोल या त्यांच्या सहकाऱ्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला .
तर महिला चालक अनयता पंडोल आणि दरीयस पंडोल हे गंभीर जखमी असून त्यांना वापी येथील रेम्बो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे .
सायरस मिस्त्री हे अहमदाबाद वरून मुंबईला जात असताना हा अपघात घडल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली .
दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी जवळील सूर्या नदीच्या पुलावरील डिव्हायडरला कार धडकल्याने हा अपघात झाला . महामार्गावर असलेल्या तीन लेन अचानक दोन लेन होत असल्याने चालकाला त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असून या महामार्गावर पालघर मध्ये अनेक ब्लॅक स्पॉट असताना देखील एन एच ए आय याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे .