५००० हजाराची लाच स्विकारताना लातूर लाचलुचपत पथकाचा यशस्वी सापळा
लातुर जिल्ह्यातील रेणापुर शहरात आरोपी लोकसेविका महिला पोलीस उपनिरीक्षक रेणुका जाधव यांनी तक्रारदार यांना त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीच्या बाजूने तपास करून मा. कोर्टात पाठविण्यात आलेल्या दोषारोपपत्राचा मोबदला तसेच यानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपी यांचे कडून भविष्यात संरक्षण देणेकामी त्यांचे रहातेघरी बोलवून सुरुवातीस 7,000/- रु ची व तडजोडी अंती 5,000/- रु ची पंचासमक्ष लाचेची मागणी केली. त्यानंतर थोड्याच वेळात आलोसे यांनी लाच मागणी केलेली रक्कम 5,000/- रु रेणापूर बस स्टँड अवारात पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून स्विकारली. त्यांना जागेवरच सापळा रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया रात्री उशीरा प्रयत्न सुरु होते.