शेवगाव पोलीस स्टेशनचा आवार स्वच्छ करून राबवली स्वच्छता मोहीम — पोलीस निरीक्षक विलास पुजारी
अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव येथील शेवगाव पोलीस ठाणे मध्ये शेवगाव नगरपरिषद व शेवगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव पोलीस स्टेशनचा आवार हा अस्वच्छतामय , व दुर्गंधीयुक्त असा होता या अस्वच्छतेमुळे पोलीस स्टेशन मधील पोलीस व कैद्यांना या अस्वच्छतेचा पर्यायाने त्रास होत होता , त्यामुळे पोलीस स्टेशनचा आवार स्वच्छ राहुन पोलिसांबरोबर कैद्याच्याही आरोग्याचा विचार पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी करून परिसर स्वच्छ केला
तेथे हॉलीबॉल साठी ग्राउंड बनवले आणी त्याचे उद्घाटनही शेवगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश भालेराव व पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा ,सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके ,यांच्या हस्ते करून हॉलीबॉल खेळाचा ही सर्व पोलीस कर्मचारी यांनी आनंद घेतला