पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची पुन्हा एक सर्वात मोठी कार्यवाही
हिंगोली जिल्ह्यातील घरफोडीतील आरोपी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखाने केले गजाआड “
हिंगोली जिल्हयातील पो.स्टे. औंढा ना. येथील घरफोडीतील आरोपी अटक करून २ लाख, ८९ हजार, ३८० रु. चा मुद्देमाल जप्त.
हिंगोली जिल्हयात होणारे चोरी, घरफोडीचे गुन्हयांना आळा घालुन सदर गुन्हे करणारे आरोपी व त्यांचे टोळीला पकडण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश देवुन वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
त्यावरून श्री.उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाने जिल्हयातील पो.स्टे. औंढा ना. गुरनं. ०१/२०२२ कलम ४५७, ३८० भादंवी. हा गुन्हा हा गुन्हा दि. ०३/०१/२०२२ रोजी घडला होता. गुन्हा घडल्यापासुन पोलीसांना पाहिजे असलेला आरोपी काळुराम उर्फ काळु पि.बाळु काळे, वय २८ वर्ष, व्यवसाय – मजुरी, रा. सुरन मोहल्ला, सेलु, ता. सेलु, जि. परभणी हा त्याचे राहते घरी असल्याचे माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक स्था. गु.शा. यांनी पथक पाठवुन सदरील आरोपीस त्याचे घरातुन अतिशय शिताफीने ताब्यात घेवुन विचारपुस केली असताना त्याने सदर घरफोडीच्या गुन्हयातील मुद्देमाल घेतल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीकडुन तपासा दरम्यान वरील गुन्हयातील सोन्याचे दागीने ज्यात झुंबर, कानातीळ बाळी, अंगठी, ओम, लॉकेट, शॉर्ट गंठन, कानचैन जोड, सोन्याचे मनी असा एकून २ लाख ८९ हजार ३८० रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री एम. राकेश कलासागर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक. श्री. उदय खंडेराय, साहेब पोलीस निरीक्षक सुनिल गोपिनवार, साहेब पोलीस निरीक्षकस. राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार संभाजी लकुळे, शेख शकील, भगवान आडे, सुनिल अंभोरे, पारु कुडमेथे, नितीन गोरे, विठ्ठल कोळेकर, राजु ठाकुर, विशाल घोळवे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर कातकडे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, शंकर ठोंबरे, शेख जावेद, प्रशांत वाघमारे, ठाकरे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी केली आहे.