हिंगोली जिल्ह्यातील पहिले ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणारी
बळसोंड येथे घरोघरी नळ योजनेच्या कामाचे नियोजन करण्यात आले.
हिंगोली पासुन जवळच असलेल्या बळसोंड ग्रामपंचायत मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ योजनेच्या कामाचे भुमीपुजन हिंगोलीचे कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शहराध्यक्ष प्रशांत सोनी, जिल्हा परिषद सदस्य अमोल जाधव, बळसोंड चे सरपंच शैलेश जैस्वाल, उपसरपंच पप्पू भाऊ चव्हाण, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी दहा कोटी रूपायांच्या निधीतुन होणाऱ्या घरोघरी नळ योजनेच्या कामाचा भुमीपुजन सोहळा संपन्न झाला.
बळसोंड भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून होता. या योजनेमुळे बळसोंड वाशियांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. ज्यामुळे ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त होत आहे..