रिपब्लिकन पक्ष (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामती तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष संजय वाघमारे यांच्या माध्यमातून बारामती येथिल डाॕ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसहती गृह बारामती येथील मुलांना विविध शालेय साहित्य वाटप व स्नेह भोजणाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी रिपाइंचे पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले, शेलार बोलताना म्हणाले की बारामती मध्ये ना आठवले साहेबांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. बारामती तालुक्यामध्ये रिपाइंची ताकद वाढलेली असुन सर्वांनी एकनिष्ठेणे व एकजुटीने काम करुण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनुकीच्या तयारीला लागण्याच्या सुचणा या वेळे उपस्थीतांना केल्या, यावेळी पश्चिम महाराष्ट्र चे विजय डॕडीं सोनवणे.रिपाइंचे नेते सुनिल शिंदे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर मोरे तालुका सरचिटणीस माऊली कांबळे जिल्हा महिलाध्यक्ष रत्नप्रभा साबळे जिल्हा युवक सरचिटनीस रविंद्र सोनवणे तालुका युवकाध्यक्ष विश्वास भोसले तालुका महिलाध्यक्ष सिमाताई चोपडे शहर महिलाध्यक्ष पुणमताई घाडगे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मुलांचे वसहतीगृहाचे पदाधिकारी उपस्थित होते.