Home वैद्यकीय गोरगरिबांचा तारणहार आरोग्य देवदूत डॉ. अशोक.रं.डोमाळे…!!!!

गोरगरिबांचा तारणहार आरोग्य देवदूत डॉ. अशोक.रं.डोमाळे…!!!!

0
गोरगरिबांचा तारणहार आरोग्य देवदूत डॉ. अशोक.रं.डोमाळे…!!!!

अष्टविनायक क्लिनिक जामदार रोड.

बारामती येथील कसबा भागात जामदार रोड अहोरात्र वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अशोक.रं.डोमाळे यांनी कु.साई दिपक सोंजे या 4 वर्षाच्या मुलाने खेळता खेळता लोखंडी खिळा गिळला होता.त्यामुळे त्याची हालत गंभीर झाली होती अशा परिस्थितीत त्याच्या पालकांनी व नातेवाईकांनी डॉक्टर डोमाळे यांच्या दवाखान्यात उपचार करण्यासाठी आणले असता त्यांना डॉक्टर डोमाळे यांनी अतिशय प्रामाणिकपणे व वैद्यकीय सेवेचा पूर्ण अभ्यास करून त्यांना धीर देत व त्या मुलाचा एक्स-रे काढण्यास सांगून एक्स-रे वरून अचूक निदान करून सदर मुलास 24 तास आपल्या देखरेखी खाली ठेवून व त्या मुलाला औषध उपचार करून त्याने गिळलेला खिळा कुठलीही शस्त्रक्रिया न करता बाहेर काढण्यास मोलाची मदत केली व त्या मुलाचे प्राण वाचवले.

त्यामुळे सदर मुलाचे पालक व नातेवाईकांना अश्रूंचा बांध फुटला व त्यांनी अश्रू नयनांनी डॉक्टर डोमाळे यांचे आभार मानले त्यामुळे डॉक्टर डोमाळे यांचे सर्व आसपासच्या नागरिकांनी व पैलवान सार्थक फाउंडेशन या सामाजिक संस्थेने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या हातून असेच चांगले कार्य घडत राहो म्हणून पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here