Gmail Storage full? जाणून घ्या तात्काळ कशी कराल मोकळी जागा
गुगलची जीमेल सेवा जगभरातील कोट्यवधी लोकं वापरतात. संवाद साधण्यासाठी जीमेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आजकाल लोकांसाठी जीमेल खाते खूप महत्वाचे आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्तीकडे ईमेल आयडी आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते जीमेल खात्याने साइन अप करतात. व्यावसायिक आणि वैयक्तिक या दोन्ही कामांसाठी जीमेलचा उपयोग केला जातो. या ईमेलच्या माध्यमातून अनेक सेवांचा अधिकृत हेतूंसाठी वापर केला जातो. मात्र यामुळे अनेक ईमेलचा खत इनबॉक्समध्ये पडत असतो. अनावश्यक ईमेलमुळे अनेकदा महत्त्वाचे मेल पाहणं राहून जातं. त्यामुळे गोंधळाची स्थिती होते. यासाठी अनावश्यक मेल डिलीट करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.
- तुमच्या PC किंवा लॅपटॉपवर Gmail उघडा.
- सर्च बारमध्ये तुम्हाला एक फिल्टर आयकॉन दिसेल. त्यावर टॅप करा. (टीप: जर तुम्हाला चिन्ह दिसत नसेल, तर तुम्हाला सेटिंग सेक्शनमध्ये जाऊन ‘Filters and blocked addresses’ टॅबमध्ये मिळेल. त्यानंतर ‘Create a new filter’बटनावर टॅप करावं लागेल.)
- त्यात वर ‘From’ लिहिलेले दिसेल. महत्त्वाच्या नसलेल्या ईमेलचे फक्त नाव किंवा ईमेल पत्ता प्रविष्ट करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला Zomato, Voot, Quora, Facebook, LinkedIn सारख्या सेवांकडून ईमेल नको असेल तर तुम्ही त्यांचा ईमेल आयडी टाकू शकता.
- एकदा ते पूर्ण झाल्यावर, फक्त ‘Create filter’ वर क्लिक करा आणि नंतर ‘Delete it’ निवडा.
- त्यानंतर तुम्हाला फक्त ‘Create filter’ वर क्लिक करायचे आहे.
मोबाईल जीमेलमध्येही अशाच प्रकारे मोकळी जागा करता येईल. तुम्ही फक्त सर्च बारवर टॅप करून “From” वर टॅपवर जावं लागेल. तुम्हाला ईमेल आयडीची यादी मिळेल. फक्त कोणालाही निवडा आणि तुम्ही सर्च बारमध्ये सेवेचे नाव मॅन्युअली टाइप करू शकता. तुम्हाला ते हटवण्यासाठी सर्व ईमेल मॅन्युअली निवडावे लागतील. हे थोडे त्रासदायक असू शकते. कारण डेस्कटॉपवर आवृत्ती एकाच वेळी सर्व ईमेल हटवण्याचा थेट पर्याय देते.