Home क्रीडा इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : हैदराबादपुढे आज कोलकाताचे आव्हान

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : हैदराबादपुढे आज कोलकाताचे आव्हान

0
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : हैदराबादपुढे आज कोलकाताचे आव्हान

मुंबई : विजयपथावर परतलेल्या सनरायजर्स हैदराबादला शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करताना यशस्वी संघात बदल करावा लागणार आहे. कारण वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.

पहिल्या दोन पराभवांमुळे खराब सुरुवात झालेल्या हैदराबादने यातून सावरत अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सविरुद्ध लागोपाठ विजय मिळवले. त्यामुळे आता विजयी  हॅट्ट्रिक साकारण्याचे  केन विल्यम्सनचे उद्दिष्ट आहे.

गोपाळ किंवा सुचितला संधी?

गोलंदाजीच्या हाताला दुखापत झाल्यामुळे वॉशिंग्टनची उणीव हैदराबाद संघाला तीव्रतेने भासेल. प्रभावी फिरकीच्या साहाय्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवताना चार बळी त्याच्या खात्यावर आहेत. शिवाय एक अर्धशतकही त्याने झळकावले आहे; परंतु किमान दोन सामन्यांत वॉिशग्टन खेळू शकणार नाही, असे कर्णधार टॉम मुडीने स्पष्ट केले आहे.   टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार आणि मार्को यॅन्सन हे त्रिकूट वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील. गेल्या दोन सामन्यांत सलामीवीर अभिषेक शर्मा (७५, ४२) आणि विल्यम्सन (३२, ५७) यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे.

गोलंदाजीत सुधारणा आवश्यक

दिल्लीविरुद्ध श्रेयस अय्यरने चमकदार अर्धशतक झळकावले; परंतु कोलकाताच्या अन्य फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. डेव्हिड वॉर्नर व  पृथ्वी शॉ यांनी गोलंदाजांवर जोरदार हल्ला करीत उभारलेले २१५ धावांचे मोठे आव्हान कोलकाताला पेलता आले नाही. फलंदाजीत अजिंक्य रहाणे , वेंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल आणि सॅम बििलग्ज यांच्याकडूनही  कोलकाताला सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे.

वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,

१ हिंदी, सिलेक्ट १

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here