बारामती, दि. २३ : नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तहसिलदार विजय पाटील यांनी आज तहसिल कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे, डॉ.भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह उप विभागीय व तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते
प्रजासत्ताक दिनाच्या ७३ वा वर्धापनदिन समारंभाचे गुरूवारी आयोजन.
बारामती, दि. २३:- प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार, दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.१५ वाजता बारामती येथील रेल्वे मैदानावर होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते होणार असल्याचे तहसिलदार विजय पाटील यांनी कळविले आहे. शासकीय ध्वजारोहण समारंभास शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी १० मिनिटे अगोदर राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.