राष्ट्रवादी काँग्रेस , आय काँग्रेस , शिवसेना या महाविकास आघाडीचे शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे हे चौध्यांदा निवडून आल्या बद्दल उमरग्यात महाविकास आघाडीच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला.
शिक्षक आमदार मतदार संघाच्या मतदानाचा नुकताच निकाल जाहिर झाला . महाविकास आघाडीचे आमदार विक्रम काळे व भाजपाचे किरण पाटील यांच्यात थेट लढत झाली . या चुरशीच्या निवडणुकीत आमदार विक्रम काळे विजयी झाले.
उमरगा – येथे महाविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडून आमदार काळे यांच्या निवडी बद्दल जल्लोष करण्यात आला. महाविकास आघाडीच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे बसवराजजी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी शिक्षक मतदारांच्या बैठका घेऊन शिक्षक मतदाराना विक्रम काळे यांना निवडून देण्याचे अवाहन केले होते. निकाल जाहिर होताच प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. येथील ठाकरे चौकात महाविकास आघाडीचे बाबूराव शहापुरे, प्रा.डॉ. रज्जाक अत्तार , विजय वाघमारे, विक्रम मस्के, चंद्रशेखर पवार , ख्वाजा मुजावर ,प्रा.डॉ. संजय अस्वले, महेश माशाळकर , नितीन कोराळे, आदि सह कार्यकर्त्यानी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला .