Home सामाजिक सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक देण्याची भारतीय युवा पँथर संघटनेची मागणी..!!

सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक देण्याची भारतीय युवा पँथर संघटनेची मागणी..!!

0
सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक देण्याची भारतीय युवा पँथर संघटनेची मागणी..!!

बारामती : भारतीय पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांच्याकडे निवेदन देऊन सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक द्या अशी मागणी केली आहे.पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी स्वतःच्या खाजगी कामासाठी पोलीस स्टेशनला येत नसतात त्यांच्याकडे नागरिक मदत मागण्यासाठी गेले असता त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनची मदत हवी असल्यास त्याच्यासोबत पोलीस स्टेशनला जात असतात त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही त्यांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे.कारण पीडित व्यक्ती व पोलीस यांच्यातील दुवा म्हणून त्या व्यक्ती काम करत असतात.बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला कामानिमित्त जावे लागते त्यावेळेस आलेल्या अनुभवावरून शुभम गायकवाड यांनी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन विनंती केली होती की पोलीस स्टेशनला येणाऱ्या सामान्य नागरिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांना सन्मानाची वागणूक देण्याचे आदेश बारामती तालुक्यातील व बारामती शहर पोलीस स्टेशनला द्यावेत.पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये एक आदराची, सन्मानाची जागा असते कोणावरही अन्याय झाला की प्रथम न्याय मिळवण्यासाठी कोणतीही व्यक्ती पोलीस स्टेशनला जात असते. पण यावेळी त्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी त्या पीडित व्यक्तीला न्याय मिळवून दिला किंवा न्याय मिळवून देण्यासाठी देण्यासाठी मदत केली तर पोलिसांबद्दल लोकांमध्ये आणखी आदराची भावना निर्माण होईल.सदर निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिले.यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, संपर्कप्रमुख शुभम गायकवाड, सरचिटणीस गणेश थोरात, बारामती तालुका महिला अध्यक्ष वंदना गायकवाड, बारामती शहराध्यक्ष निखील भाई खरात, बारामती शहर संघटक समीर खान, सदस्य नितीन (दादा)गायकवाड,अरुण मोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here