Home सामाजिक मानवता हाच खरा धर्म बेवारस बेघर मनोरुग्ण महिलेस समाजसेवक राजु गावडे यांनी अनाथ आश्रमात केले दाखल..!!

मानवता हाच खरा धर्म बेवारस बेघर मनोरुग्ण महिलेस समाजसेवक राजु गावडे यांनी अनाथ आश्रमात केले दाखल..!!

0
मानवता हाच खरा धर्म बेवारस बेघर मनोरुग्ण महिलेस समाजसेवक राजु गावडे यांनी अनाथ आश्रमात केले दाखल..!!

बारामती :काल दिनांक १४ जुलै रोजी पाहुणेवाडी ता.बारामती येथे मनोरुग्ण बेवारस बेघर महिलेला यशोधन ट्रस्टला समाजसेवक राजु गावडे व महाराष्ट्र 24 न्युज लाईव्ह चे उपसंपादक यांनी दाखल करून मानवता धर्म निभावला. या मनोरुग्ण महिलेची माहिती फोन द्वारे एका व्यक्तीने समाजसेवक राजु गावडे यांना मिळाली.तिची माहिती घेतली असता फक्त तीने माधवी असे नाव सांगितले.ती महिला मानसिक, मनोरुग्ण, बेवारस निराधार असल्याचे लक्षात आले. पण ती खूप दिवसा पासून रोड वर असेल असा अंदाज आहे कारण,तीच्या डोक्यात जख्मा होत्या.यावेळी यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवि बोडके यांच्याशी फोनवरून संपर्क करून, सदर बेवारस मनोरुग्ण महिला माहिती दिली असता, त्यांनी त्यास तत्काळ प्रतिसाद देऊन, महिलेला या संस्थेत दाखल करण्याचा शब्द दिला. त्वरित माळेगाव पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक किरण आवचर साहेब, कांबळे साहेब, मोहिते साहेब व महिला पोलिस यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here