बारामती : बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथील हेमंत शिवाजी देवलकर वय ४५ ही व्यक्ती दिं.३०/०७/२०२३ रोजी १३:०० वा.सुमारास मौजे मुढाळे गावच्या हद्दीत जाधववाडी गावामध्ये जाणारे रोडच्या कडेला ११०० रुपये किंमतीची १० लिटर अवैध्य बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विकत असताना मिळून आला.याबाबत पो. काँ.विलास महादेव ओमासे यांनी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली असून गु.र.नं:-४२७/२०२३ मु.पो.का.क.६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्यात आला असून पुढील तपास स.फौ.खोमणे हे करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेमध्ये मिथुन प्रकाश हरावत राहणार मुढाळे ता.बारामती ही व्यक्ती
दि. ३०/०७/२३ रोजी १६:३०वा .सुमारास मोजे मुढाळे गावचे हद्दीत कानांडवाडी गावामध्ये जाणारे रोडच्या कडेला आठशे रुपये किमतीची आठ लिटर गावठी हातभट्टी दारू विकत असताना आढळून आला याबाबत पो. कॉ. विलास महादेव ओमासे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा रजिस्टर नंबर ४२८/ २०२३मुं. पो. का. क्र. ६५प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक मणेरी हे करीत आहेत.