बारामती: वडगाव निबाळकर येथील सुवर्णा दशरथ ठोंबरे (वय 44 ) यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या डॉक्टर पतीसह सहाजणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुवर्णा यांचे पती डॉ. दशरथ बाजीराव ठोंबरे (रा. वडगाव निंबाळकर), बाजीराव बापू ठोंबरे, रंजना बाजीराव ठोंबरे (रा. सस्तेवाडी, ता. बारामती), दयाराम बापूराव कोळेकर (रा. कोळेकरवस्ती, झारगडवाडी, ता. बारामती), करिना बागवान (रा. वडगाव निंबाळकर) व राजेंद्र तुकाराम होळकर (रा. सस्तेवाडी, ता. बारामती), अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत या प्रकरणी सुवर्णा यांचे भाऊ आनंद पोपटराव देवकाते (रा. सोनगाव, ता. बारामती) यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सुवर्णा यांनी मंगळवारी (ता. 26) सायंकाळी साडेपाच वाजता राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोप ठेवण्यात आलेल्या व्यक्तींनी सुवर्णा यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. पतीने दारू पिऊन येत वारंवार मारहाण केली. या त्रासाला कंटाळून त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.