Home सामाजिक भारतीय युवा पँथर संघटना व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला यश ..!!

भारतीय युवा पँथर संघटना व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला यश ..!!

0
भारतीय युवा पँथर संघटना व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला यश ..!!

बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील कंत्राटी कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या.तसेच कर्मचारी व कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मोफत उपचार रुग्णालयात मिळावा.अशी मागणी कर्मचारी यांची आहे.सदर मागणीसाठी भारतीय युवा पँथर संघटना रुग्णालयासमोर उपोषण केले होते.सदर उपोषणात कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. सदर उपोषणाची दखल घेऊन रुग्णालयाचे आधिष्ठाता यांनी लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.सदर संघटनेच्या व कर्मचारी यांच्या मागणीनुसार किमान वेतन कायद्याने वेतन देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा रुग्णालय प्रशासन करणार आहे.तसेच कर्मचारी यांना मोफत उपचार देण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.सदर उपोषणाला कंत्राटी कर्मचारी व भारतीय युवा पँथर संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कर्मचारी यांनी भारतीय युवा पँथर संघटनेचे पदाधिकारी यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here