मेडद या गावांमध्ये गेले अनेक वर्षापासून वारंवार ग्रामसेवकांना व गट विकास अधिकाऱ्यांना पाणी सोडणाऱ्या शिपायाची वारंवार तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. मेडद गावच्या ग्रामपंचायत च्या पाणी सोडणाऱ्या शिपायाला ग्रामसेवकच पाठीशी घालतात. त्याचबरोबर पाणी सोडणाऱ्या शिपायाचा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे तो ग्रामपंचायतची नोकरी कमी स्वतःच्या मंडप व्यवसायामध्ये जास्त व्यस्त असतो त्याच्यामुळे मेडद ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही व कुणी त्या शिपायाची तक्रार केल्यास जाणीवपूर्वक कुठल्याही अधिकाऱ्याचे आदेश नजुमानता तक्रार केल्यानंतर दोन-तीन दिवस पाणी सोडत नाही, व ग्रामस्थांना नाहक त्रास देत वेठीस धरले जाते.ग्रामसेवकांना व गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसभेमध्ये व प्रत्यक्ष भेटून पाण्याच्या समस्या सांगितल्या तरीही शिपायावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. नक्की शिपाई बाळू नाळेला का प्रशासन पाठीशी घालते. मेडद ग्रामस्थांचा पाणी प्रश्न पाणी समस्या कधी दूर होणार. गेल्या अनेक वर्षापासून हाच ग्रामस्थांना पडलेला प्रश्न आहे .अद्यापही शासनाने ग्रामपंचायत ने कधीही गांभीर्याने या प्रश्नाची या समस्येची दखल घेतलेली नाही. हा केवळ सांडपाण्याचा प्रश्न आहे. पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न-समस्या मात्र कायम. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा फिल्टर ही बसवला पण तो बसवल्यानंतर केवळ सहाच महिने चालला त्याच्यानंतर गेले तीन-चार वर्षे तो फिल्टर धूळ खात पडलेला आहे. मेडद गावचा पाणी प्रश्न हा सुटणार का ग्रामस्थांना मुबलक पाणी व पिण्याचे पाणी मिळणार का?नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे पाणी सोडणारा हा शिपाई व्यसनाधीन असल्यामुळे त्याला पाणी सोडण्याचे त्या व्यसना पुढे भानच राहत नाही अशी दबक्या आवाजामध्ये नागरिकांमध्ये चर्चा आहे.
तसे आम्हाला त्या शिपायाचे व्हिडिओ-फोटो ही नागरिकांनी पाठवलेली आहे.