बारामती ( प्रतिनिधी ) : बारामती तालुक्यातील लाटे येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमी चा प्रश्न मार्गी लावा अन्यथा, बारामती येथील प्रांत कार्यालय येथे सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सदर मुस्लिम समाजाच्या दफनभूमी ची जागा ही राखीव असून ,त्या जागेवर अतिक्रमण केले असून, सदर चे अतिक्रमण काढून त्या जागेवर संरक्षक भिंत बांधावी अशी लाटे येथील मुस्लिम समाजाची मागणी आहे . ही मागणी गेली अनेक वर्ष प्रलंबित असून, हि मागणी संबंधित प्रशासनाने पूर्ण करावी अशी लाटे येथील मुस्लिम समाजाने विनंती केली आहे.