जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध खेळांच्या स्पर्धेत एक सारख्या गणवेशात सहभागी होता यावे याकरिता मेडद गावचे सरपंच पै. गणेश काशीद यांनी ५० क्रीडा गणवेश भेट दिले.बारामती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संपतराव गावडे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल सरपंच गणेश काशीद यांचे अभिनंदन केले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मेडद शाळेत यशवंतराव चव्हाण कला – क्रीडा महोत्सव तालुका पातळी, बीट पातळी व केंद्र पातळी क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. यावेळी सरपंच गणेश काशीद यांनी शाळेस क्रीडा गणवेश भेट दिले.यावेळी उपसरपंच आकाश बागाव, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास निकम, राजाराम गाढवे, रोहिणी कांबळे, सोनाली नेवसे,करुणा यादव, पोलीस पाटील चैत्राली झगडे, प्रकाश मोरे, बबन गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव देशमाने, उपाध्यक्ष कल्पना जाधव, सदस्या कोमल कांबळे, मनीषा कांबळे, दिलशान शेख, अश्विनी गायकवाड, पुनम काशीद, बाळासाहेब नाळे, संजय नेवसे, ग्रामसेवक संपत वाबळे, मुख्याध्यापक ज्योत्स्ना वाघमोडे, उषा भोसले, सुरेंद्र गायकवाड, अशोक सोनवणे,अर्चना गावडे,कविता गावडे उपस्थित होते.