बारामती प्रतिनिधी :- रियाज पठाण
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मुख्याध्यापक ज्ञानदेव सस्ते व उपशिक्षक रेवननाथ सर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील महिला उपशिक्षिका सुनिता शिंदे व मनीषा चव्हाण यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम आयोजन करून माता पालकांना ‘आनंदी पालकत्व ‘ याविषयी सांगवी येथील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या भाग्यश्री तावरे यांच्या व्याख्यानाचा लाभ माता पालकांना मिळाला .सदरच्या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचे योगदान, घरातीत वातावरणाचा बालमनावर होणारा चांगला -वाईट परिणाम, विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात कळत नकळत कुटुंबात होणाऱ्या विविध गोष्टी अनुकरण करतात .माता पालकांनी मुलांच्या पालन पोषणात अभ्यासा बाबत जागृकता बाळगावी . निसर्ग हा पहिला पालक असून आपण मुलांना काय करू नको हे सांगतो परंतु काय करावे हे ही सांगता आले पाहिजे . बालकांशी संवाद साधावा, प्रतिसाद द्यावा . जिजाऊंनी स्वप्न पाहिले म्हणून राजे घडले .भावनांना विचाराची जोड देता आली पाहिजे .आपण जशी अपेक्षा करतो त्यासाठी कर्तव्य पालन ही करावे या विषयी अतिशय ओघवत्या भाषेमध्ये माता पालकांना मार्गदर्शन केले . त्यांचा शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला .कांबळेश्वर गावच्या सरपंच मंदाकिनी कानडे,ग्रामपंचायत सदस्या सीमा खलाटे,मंगल कुंभार ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शितल कुंभार उपाध्यक्षा राजश्री आगवणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला . जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील उपशिक्षिका सुनीता शिंदे व मनीषा चव्हाण यांनी महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान केला .त्याचबरोबर नव्याने शाळेमध्ये सुरू असलेला अबॅकस वर्ग मार्गदर्शक शितल भगत यांचा व नव्याने इयत्ता पहिली मध्ये दाखल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या खरात मॅडम यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला . शाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असताना माता पालकांना बरोबर घेऊन विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता वाढीमध्ये मनापासून यशस्वी उपक्रम राबवणाऱ्या महिला शिक्षिका सुनीता शिंदे व मनीषा चव्हाण यांचा सरपंच व पदाधिकारी यांनी सन्मान करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या . महिला दिनानिमित्त सरपंच मंदाकिनी कानडे व शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष राजश्री आगवणे यांनी महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.