बारामती मध्यवर्ती ठिकाणी रचना मार्केट येथे मुख्यमंत्री सहायता निधी वैदयकीय मदत कक्ष कार्यालयाचे उद्घाटन दि.6 मार्च रोजी मुख्यमंत्री कार्यालयाचे ओ.एस.डी. श्री. मंगेशजी चिवटे यांच्या हस्ते पार पडले या वेळी बोलताना मंगेशजी चिवटे म्हणाले की सामाजिक कार्यकर्ते सतिश गावडे यांनी हे कार्यालय स्थापन करण्यासाठी खुप प्रयत्न केले त्यांच्या मध्ये जिद्द व चिकाटी असल्याने हे शक्य झाले आहे तसेच त्यांनी गोरगरीब रुग्णांना जास्तीत जास्त मदत मिळवुन देण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांचे फॉर्म भरून त्याला लागणारी कागद पत्र जमा करावीत म्हणजे ती फाईल माझ्याकडे आल्यानंतर पाच दिवसाच्या आत त्या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळेल व त्या रुग्णांना आर्थिक दृष्ट्या आधार या माध्यमातुन मिळेल.असे माध्यमांना बोलताना मंगेश चिवटे म्हणाले आहेत.या वेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट.श्री.गुलाबराव गावडे होते शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा समन्वयक श्री. विशाल धुमाळ, शिवसेना वैदयकिय मदत कक्ष पुणे जिल्हा समन्वयक श्री.सतीश गावडे, पुणे जिल्हा शिवसेना कार्याध्यक्ष श्री.वस्ताद पप्पू माने,श्री.धनाजी गावडे पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महिला आघाडीच्या सौ.सुनीता ताई डोंबाळे, शिवसेना वैद्यकीय मदत पुणे जिल्हा उप समन्वयक सौ.विद्याताई राजे गायकवाड, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सौ.पुष्पांजली जडे.पत्रकार श्री.निलेश गजरमल,श्री.श्रेयश भोसले, श्री.संदीप पोमणे, श्री.बाबू केदार, सौ.निर्मलाताई तावरे, सौ.सारिका पाटील,श्री.राजेश नागरगोजे, सौ.गीता जायभाय, श्री.मोहसीन शेख श्री.सोनू माकर, डॉ.अनिल जडे, सौ.सिमा कल्याणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.