बारामती : बुद्ध विहार सिद्धार्थ नगर आमराई बारामती येथे बाल संस्कार वर्गाची निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत परिसरातील मुलांनी सहभाग घेतला होता.सदर निबंध स्पर्धेत तीन क्रमांक देण्यात आले त्यामध्ये प्रथम क्रमांक : श्रुती प्रवीण सोनवणे द्वितीय क्रमांक : मनस्वी तुषार कांबळे,तृतीय क्रमांक : पूर्वा सुनील साळवे या तिन्ही स्पर्धकांना श्री.रवी हनुमंत साबळे, शिक्षक क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी, ॲड.पूजा सुरेश कांबळे,श्री.समाधान लोंढे यांचे हस्ते बक्षीस म्हणून महापुरुषांचे जीवन चरित्र वरील पुस्तके देण्यात आली. यावेळी संकेत शिंदे ,अस्मिता शिंदे,समाधान लोंढे यांनी पूजापाठाचा कार्यक्रम घेतल्या नंतर लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. सदर उपक्रम सिद्धार्थ नगर येथील युवा वर्ग, भारतीय युवा पँथर संघटना,भारतीय बौद्ध महासभा यांनी आयोजित केला होता.यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,संपर्क प्रमुख शुभम गायकवाड,शहर अध्यक्ष निखिलभाई खरात,शहर संघटक समीर खान,सुरज गायकवाड,सावन कांबळे, तसेच परिसरातील नागरिक मिलिंद शिंदे, प्रेम मोरे,अनिश गायकवाड,संदीप अहिवळे, दत्ता शिंदे,,सिद्धार्थ नगर येथील युवा वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.