वंचित बहुजन आघाडी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत पूर्ण ताकदीने उभी राहणार- सिद्धांत सावंत उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बारामती शहर.
बारामतीः-(प्रतिनिधी : रियाज पठाण .) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. बारामतीत उमेदवार उभा न करता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे वतीने घेण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद या निर्णयामुळे सुप्रिया सुळे यांच्या सोबत राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर यांनी यावे यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. मात्र त्यात यश न आल्याने वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली होती.बारामतीत वंचित बहुजन आघाडी काय निर्णय घेणारयाबाबत उत्सुकता होती, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी बारामतीत उमेदवार उभा न करता सुप्रिया सुळे यांनापाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुप्रियासुळे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची ताकद यानिवडणुकीत राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.