बारामती :- प्रतिनिधी -रियाज पठाण
आचार संहिता असताना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ श्रीकांत शिंदे,मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांनी दिनांक ०२/०४/२०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी ओएसडी मंगेश चिवटे मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी सई दिपक जगताप रा. वडगाव तालुका बारामती जिल्हा पुणे वय सहा वर्षं हि मुलगी दोन्ही पायाने अपंग असुन तिला एस आर सी सी चिल्ड्रन हॉस्पिटल नवी मुंबई या हॉस्पिटलमध्ये एका पायाचे ऑपरेशन साठी ऍडमिट केले ; असता तेथील डॉक्टरांनी दीड लाख रुपये खर्च सांगितला असता, ते वरील पेशंटला भरणे शक्य नव्हते. परंतु त्यांनी बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क कार्यालय मारवाड पेठ बारामती येथे बारामतीतील वारकरी सांप्रदाय मधील किर्तनकार शेखर महाराज जाधव यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी तात्काळ शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक सतीश गावडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता सतीश गावडे यांनी प्रथमता त्या पेशंटला धीर देऊन असे सांगितले की तुम्ही बिलकुल घाबरू नका, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे व श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे,व मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी एचडी मंगेश चिवटे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहरी राऊत, माळेगाव कारखान्याचे विद्यमान संचालक ऍड.गुलाबराव बाजीराव गावडे व पुणे जिल्हा कार्याध्यक्ष वस्ताद पप्पू माने.यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त मदत करण्याचे प्रयत्न करतो व त्या बाळाचे तुम्ही ऑपरेशन साठी तयारी करा व पेशंटला ऍडमिट करा असे सल्ला सतीश गावडे यांनी दिला. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या दिपाली मॅडम व निलेश देशमुख यांनी त्या पेशंट संदर्भात सर्व माहिती व मुख्यमंत्री सहायता चा फार्म भरून दिला नंतर चार ते सहा दिवसांमध्ये त्यांना मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून जवळजवळ ५० हजाराची मदत तात्काळ व वेळेत मिळवून दिली. त्याबद्दल पेशंटच्या नातेवाईकांनी आज बारामती मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क कार्यालय मारवाड पेठ बारामती येथे येऊन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क कार्यालयाचे पुणे जिल्हा समन्वयक सतीश गावडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बारामती महिला आघाडीच्या सुनीता डोंबाळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पुष्पांजली जडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे उपजिल्हा समन्वयक विद्या राजे गायकवाड,शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे किरण राजे निंबाळकर. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी मोहसीन शेख,डॉ.अनिल जडे, वारकरी सांप्रदायाचे शेखर महाराज जाधव,संतोष नाळे, संदीप पोमणे,श्रेयश भोसले, बाबू केदार,संदीप पोमणे ऍड.सारिका पाटील, राजू नागरगोजे, सारिका जायभाजे,निर्मला तावरे, कल्पना जाधव व इतर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकाऱ्यांची पेशंटच्या नातेवाईकांनी बारामती येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क कार्यालयामध्ये येऊन वरील मान्यवरांचे व शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.