Home राजकीय बारामतीत लोकसभेचा फॉर्म कसा भरतो म्हणून,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओ बी सी विभागाचे रोहित बनकर यांच्यावर जिवघेणा हल्ला..!!

बारामतीत लोकसभेचा फॉर्म कसा भरतो म्हणून,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओ बी सी विभागाचे रोहित बनकर यांच्यावर जिवघेणा हल्ला..!!

0
बारामतीत लोकसभेचा फॉर्म कसा भरतो म्हणून,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओ बी सी विभागाचे रोहित बनकर यांच्यावर जिवघेणा हल्ला..!!

बारामती :- प्रतिनिधी रियाज पठाण

बारामती येथील प्रगतीनगर येथे गुरुवारी (दि. ४) रोजी एकावर घरातून खाली बोलवून जीवघेणा हल्ला करण्याची घटना घडली आहे. सदर घटनेत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओ बी सी विभागाचे रोहित बनकर (वय ४०, रा. आदित्य प्राईट, प्रगतीनगर, बारामती) हे जखमी झाले आहेत. प्रसंग अवधान दाखवल्याने रोहित बनकर यांचा जीव वाचला आहे. या घटनेची नोंद बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबु पवार व रोहन (पुर्ण नाव माहित नाही) नामक संशयित आरोपींनी रोहित बनकर यांना लोकसभेचा फॉर्म कसा भरतो, असं म्हणत फायटरने मारहाण केली. तसेच रोहित बनकर यांना जीवे मारण्याची धमकी दिले. या हल्ल्यात रोहित बनकर जखमी झाले. मात्र रोहित बनकर यांच्यावर हल्ला झाल्याचा पाहून स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा केल्याने आसपासचे लोक जमा होऊ लागले. यामुळे बाबु पवार, रोहनसह इतर पाच जणांनी तेथून पळ काढला.सदर घटनेनंतर रोहित बनकर यांनी बारामती शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली असून भादंवि कलम ३२४,१४७,१४८,१४९,५०४,५०६ नुसार गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई राऊत हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here