इंदापूर प्रतिनिधी:- जावेद शेख
शिवराज्य शेतकरी विकास मंचचे महाराष्ट्रातील कार्य कौतुकास्पद असून शिवराज्य शेतकरी विकास मंच चे महाराष्ट्रात एक सामाजिक कार्याचा ठसा उमटवलेला आहे असे आरपीआय नेते शिवाजीराव मखरे यांनी शिवराज्य शेतकरी विकास मंच ने बुधवारी इंदापूर शहरात आयोजित केलेल्या रोजा इफ्तार पार्टीत उद्गार काढले.शिवराज्य शेतकरी विकास मंच गेले तीन वर्षापासून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करत असल्याचेही आरपीआय नेते शिवाजीराव मखरे यांनी असे सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातच देशाला एकसंध व एकत्र ठेवण्याची शिकवण दिलेली आहे असेही आरपीआय नेते शिवाजीराव मखरे यांनी सांगितले. शिवराज्य शेतकरी विकास मंच ने असेच कार्य चालू ठेवल्यास या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. इंदापूर शहरातील मस्जिद चे मौलाना तसेच शहरातील प्रतिष्ठित, नामवंत नागरिक त्याचप्रमाणे शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शिवराज्य शेतकरी विकास मंच ने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. सर्वधर्मीय जातीय सलोखा जोपासला जावा ,समाजा -समाजामध्ये एकता आणि सामाजिक सलोख्याचा विश्वास अधिक दृढ व्हावा या उद्देशाने शिवराज्य शेतकरी विकास मंच इंदापूर शहरात कसबा या ठिकाणी दरवर्षी हिंदू- मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करीत असते. यावेळी इंदापूर शहरातील मस्जिदचे मौलाना यांचा सत्कार आरपीआय चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आरपीआय नेते शिवाजीराव मखरे यांच्या हस्ते करण्यात आला. मुस्लिम ओबीसी आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष तय्यबभाई तांबोळी यांनी शिवाजीराव मखरे यांचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज्य शेतकरी विकास मंच चे संस्थापक प्रदेश अध्यक्ष जावेद शेख तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष वैभव सोनवणे, शिवराज्य शेतकरी विकास मंच चे पुणे जिल्हा अध्यक्ष गुणवंत दळवी, पश्चिम महाराष्ट्राचे विजय भाऊ कांबळे ,सोहेल तांबोळी यांनी प्रयत्न केले.