भारतीय युवा पँथर संघटना सातारा जिल्हा व फलटण तालुका शहर पदाधिकारी यांची आढावा बैठक कोळकी येथे संपन्न झाली.यावेळी नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.फलटण तालुका अध्यक्ष पदी रत्नदीप (सोनू) इंगळे,फलटण तालुका कार्याध्यक्ष पदी तेजस्विनी मोरे,फलटण शहर कार्याध्यक्ष पदी मनीषा मोरे यांची संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.यावेळी संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य शुभम गायकवाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगल ताई जाधव, सातारा जिल्हाध्यक्ष अलका बनसोडे, फलटण तालुका अध्यक्ष रत्नदीप इंगळे,फलटण तालुका कार्याध्यक्ष पार्वती काळे, फलटण तालुका उपाध्यक्ष शीला अहिवळे फलटण शहर अध्यक्ष रजिया शेख, भाग्यवंत वायदंडे झिरपवाडी शाखा व इतर सदस्य उपस्थित होते.