Home Home मोरगांव मध्ये महावितरण महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार,वीज बिलाच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून, वार झालेल्या महावितरणच्या तंत्रज्ञ महिलेची जगण्याची लढाई संपली..!

मोरगांव मध्ये महावितरण महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार,वीज बिलाच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून, वार झालेल्या महावितरणच्या तंत्रज्ञ महिलेची जगण्याची लढाई संपली..!

0
मोरगांव मध्ये महावितरण महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार,वीज बिलाच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून,  वार झालेल्या महावितरणच्या तंत्रज्ञ महिलेची जगण्याची लढाई संपली..!

उपचारादरम्यान दुर्दैवी अंत..

बारामती :-प्रतिनिधी : रियाज पठाण

मोरगाव येथील वीज ग्राहकाने कोयत्याने वार केलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञ महिला कर्मचारी रिंकू राम थिटे या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. कोयत्याने गंभीर वार झाल्याने ही महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली होती.या महिला कर्मचाऱ्यास पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलीस सूत्राने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने महावितरण मध्ये मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे.पोलिसांनी आरोपी अभिजीत पोते याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. ही घटना आज सकाळी 11 च्या सुमारास घडली. अभिजीत पोते हा महावितरणचा वीज ग्राहक असून त्याच्या घरातील विज बिल सातत्याने जास्त येते अशी तो तक्रार करत होता.माझ्या घराचे वीज बिल मीटरचे रीडिंग घेऊन हे बिल का जास्त येते हे पहा असे तो सातत्याने सांगत होता, मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे त्याला वाटल्याने त्याने चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यामध्ये रिंकू राम थिटे ही तांत्रिक कर्मचारी महिला त्याच्याशी बोलत असताना त्याने रागाने तिच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात रिंकू थिटे यांना प्रतिकार करण्याची ही संधी मिळाली नाही. तसेच त्या स्वतःला वाचवूही शकल्या नाहीत. यामध्ये कोयत्याचे वार वर्मी लागल्याने रिंकू या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले, मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here