बारामती : ( प्रतिनिधी रियाज पठाण ) श्री मोरया सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने अनाथ मुलांना अन्नदान करून हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी संस्थापक अध्यक्ष शुभम गोपी पडकर गुलाब धोत्रे,अमर पवार ,गणेश पवार, साहिल सय्यद,व सर्व सहकारी मित्र परिवार उपस्थित होते.समाजातील विविध स्तरातील व्यक्तींकडून श्री मोरया सामाजिक प्रतिष्ठान यांच्यावर या उपक्रमा बद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.