फलटण : भारतीय युवा पँथर संघटना महाराष्ट्र राज्य यांनी फलटण येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला.श्रीमंत आनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी भारतीय युवा पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्यासोबत बैठक घेतली होती. यावेळी संघटनेचे सातारा व फलटण तालुका शहर पदाधिकारी उपस्थित होते.त्यानंतर फलटण येथे श्री शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत पाठिंबा देण्यात आला.बेरोजगारी, वाढती महागाई आणि खाजगीकरण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार यांना पाठिंबा दिला आहे. असे संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलताई जाधव यांनी मत व्यक्त केले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम गायकवाड ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलताई जाधव यांच्या हस्ते पाठिंबा पत्र देण्यात आले. यावेळी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अलका बनसोडे, फलटण तालुका अध्यक्ष महिला पूजा जगताप,फलटण तालुका कार्याध्यक्ष पार्वती काळे, फलटण तालुका कार्याध्यक्ष शिला अहिवळे,फलटण शहर अध्यक्ष रजिया शेख,आकाश बनसोडे,अजय काळे, संघटनेच्या ग्रामीण भागातील शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.