फलटण : — विश्वाला शांतीचा आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाला रुग्णालयातील आधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले त्याबद्दल संघटनेच्या वतीने सातारा जिल्हा अध्यक्ष अलका बनसोडे यांनी आभार मानले.सदर कार्यक्रम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलाताई जाधव यांनी आयोजित केला होता.यावेळी भारतीय युवा पॅंथर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलताई जाधव, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तबसुम सय्यद , सातारा जिल्हा अध्यक्ष अलका बनसोडे,सातारा जिल्हा उपाध्यक्ष अजय काळे,फलटण तालुका अध्यक्ष पूजा जगताप,फलटण तालुका कार्याध्यक्ष पार्वती काळे,फलटण तालुका सरचिटणीस तेजस्विनी मोरे,तालुका उपाध्यक्ष शिला अहिवळे,फलटण शहर अध्यक्षा रजिया शेख,शहर उपा उपाध्यक्षा वंदना यादव,शहर कार्याध्यक्ष मनीषा मोरे,सदस्य चंदा डांगे,स्नेहा भोसले,साक्षी जाधव उपस्थित होते.