Home सामाजिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समितीतर्फे फलटण रोड येथे बुद्ध जयंती साजरी.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समितीतर्फे फलटण रोड येथे बुद्ध जयंती साजरी.

0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समितीतर्फे फलटण रोड येथे बुद्ध जयंती साजरी.

बारामती : विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे बुद्ध जयंती साजरी करून मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला.मागील आठ वर्षांपासून जीवनज्योत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संयुक्त जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविला जात आहे. यंदा शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बारामती बँकेचे चेअरमन सचिन शेठ सातव, मंडल अधिकारी एम. पी. सय्यद, अॅड. अमोल सोनवणे, गणेश जोजारे, विपुल आन्ना ढवाण पाटील, पत्रकार योगेश नालंदे,संदेश गालिंदे, पत्रकार तैनूर शेख, भावी नगरसेवक विक्रम लांडगे,आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी योगेश महाडिक, चैतन्य गालिंदे, प्रतीक जोजारे, समीर शाह, वसीम तांबोळी, रंजीत मोतीकर,गणेश गालिंदे, सचिन बचाव,निखिल शीलवंत, रफिक शिकीलकर वाहिद पिंजारे आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here