फेलोशिपच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचा भाग होऊन, राजकीय बदलासाठी वंचित बहुजन आघाडीच्या या अभियानात सामील व्हा.
फुले-शाहू-आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय वारसा पुढे नेऊन देशातील सर्व सामाजिक, राजकीयदृष्ट्या वंचित आणि उपेक्षित समाजाचा विकास करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या या फेलोशिप कार्यक्रमात काम करण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे.फुले-शाहू-आंबेडकर फेलोशिपची आखणी कुशल आणि स्मार्ट तरुणांसाठी करण्यात आली आहे. जे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना निवडणूक आणि प्रचार मॅनेजमेंटसाठी मदत करतील. ही फेलोशिप 15 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीसाठी असून तरुणांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून काम करावे लागणार आहे.या फेलोशिपसाठी मानधन देण्यात येणार असून फेलोशिपदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तरुणांना दीर्घकाळासाठी संधी प्रदान केल्या जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 जुलै आहे. तसेच, शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.नाव नोंदणीसाठी खालील गुगल फॉर्म भरा. https://forms.gle/wGtDTLEK8neMPLP78